S M L

बोगस डिग्रीप्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2015 12:54 PM IST

बोगस डिग्रीप्रकरणी दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र सिंग तोमर यांना अटक

09 जून :  जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जितेंद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे.

तोमर यांनी बिहारच्या एका विद्यापीठातून बोगस पदवी सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तोमर यांचा खटला दिल्ली हायकोर्टात प्रलंबित आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी त्यांना आज अटक केली. त्यांना सर्वप्रथम हौजखास पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

दरम्यान, दिल्लीचे पोलीस पंतप्रधान मोदी यांच्या आदेशावरून कारवाई करत आहेत. कोणतीही नोटीस न पाठवता तोमर यांना अटक करण्यात आली असून, मोदी सरकार आकसापोटी अटकेची कारवाई करत असल्याचा 'आप'ने आरोप केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close