S M L

मोदींनीच सहकार्‍यांना जातीयवादी व्यक्तव्य करायला दिली मुभा -सोनिया गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2015 04:37 PM IST

32sonia_on_modi09 जून :  नरेंद्र मोदींनी आपल्या सहकार्‍यांना जातीवाचक वक्तव्य करण्याची मुभा दिल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केला आहे. काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांची आज दिल्लीमध्ये परिषद होतं आहे. या परिषदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाचं हल्लाबोल केला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चांगले प्रशासक म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे मात्र, त्यांनी आपल्या सहकार्‍यांना जातीयवादी वक्तव्यं करायला मोकळीक दिली आहे, अशा शब्दात सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर तोफ डागली आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची अशा प्रकारे ही पहिलीच परिषद होत आहे. काँग्रेसची सध्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, मिझोराम, मणिपूर, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये सत्ता आहे. या राज्यांचे मुख्यमंत्री परिषदेला उपस्थित आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close