S M L

पाटण्यात राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरूवात

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2015 04:33 PM IST

24ncp_samana09 जून : बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज (मंगळवार)पासून पाटणामध्ये सुरू होतंय. दोन दिवस हे अधिवेशन सुरू राहणार आहे. आज विस्तारीत कार्यकारिणीची बैठक होतेय.

पक्षाच्या विविध सरचिटणीसांचे 2012-2015 या कालावधीचे अहवाल, जमाखर्च पटलावर मांडले जातील. राष्ट्रीय राजकारणाची सद्यस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि संघटनात्मक बाबीसंदर्भात ठरावाचा मसुदा मांडला जाईल.

उद्या विविध सरचिटणीसांद्वारे अहवालांचे सादरीकरण होणार आहे. आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीची घोषणा होणार आहे. बिहारमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं बिहारमध्ये अधिवेशन होतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2015 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close