S M L

ललित मोदींना मदत केल्याची सुषमा स्वराज यांची कबूली

Samruddha Bhambure | Updated On: Jun 14, 2015 02:16 PM IST

ललित मोदींना मदत केल्याची सुषमा स्वराज यांची कबूली

14 जून : आयपीएलचे पहिले आयुक्त ललित मोदी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे समोर आल्याने मोदी सरकारची कोंडी झाली आहे. सन्डे टाइम्स या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून ललित मोदी यांच्या ट्रॅव्हल डॉक्यूमेंट्सना मंजुरी दिल्याचं म्हटलं आहे.

आयपीएलमधील गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी ललित मोदी यांचा भारतीय पासपोर्ट काढून टाकण्यात आलेला आहे. भारतात येण्यासाठी ट्रॅव्हल व्हिसा मिळवून देण्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली होती. 2013 मध्ये सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या असताना त्यांनी ललित मोदींची मदत केल्याचा गौप्यस्फोट सन्डे टाइम्सने केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ललित मोदी यांच्या पत्नी कर्करोगाने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर 4 ऑगस्टला पोर्तुगालमध्ये शस्त्रक्रिया करणार येणार होती. त्यामुळे मी माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना भारतात येण्याची परवानगी दिली होती, असं सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

मोदींनी परदेशदौरा केल्याने भारताला कसलीच अडचण नसल्याचं स्वराज यांनी सांगितलं. त्यांच्या शिफारसीनंतर ललित मोदींना यूकेबाहेर पडण्याची परवानगी मिळाली. त्यासाठी सुषमा स्वराज यांनी ब्रिटीश खासदार किथ वाझ आणि ब्रिटीश उच्चायुक्तांकडे मोदींची शिफारस केली होती. या प्रकरणी यांनाही चौकशीला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रसचे नेते दिग्विजय सिंग यांनी यावर सुषमा स्वराज यांनी खुलासा करून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2015 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close