S M L

'वन रँक, वन पेंशन'साठी माजी लष्करी जवानांचं देशभरात 'महासंग्राम' आंदोलन

Samruddha Bhambure | Updated On: Jun 14, 2015 01:47 PM IST

'वन रँक, वन पेंशन'साठी माजी लष्करी जवानांचं देशभरात 'महासंग्राम' आंदोलन

14 जून : 'वन रँक, वन पेंशन'च्या मुद्यावरून दिल्लीत माजी सैनिक आता मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. 'महासंग्राम' आशा नावाने या आंदोलनाला संबोधलं जातं असून या आंदोलनाची सुरुवात दिल्लीतील जंतर-मंतरवरून झाली आहे. यात जवळपास 5 हजार निवृत्त लष्करी जवान सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले वन रँक वन पेंशनचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच जतंर-मंतर मैदानावर मोदी सरकार विरोधात प्रदर्शने सुरू आहेत. या आंदोलनांतर्गत देशभरातल्या 55 शहरांमध्ये रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहेत. इतकंच नाही तर माजी सैनिकांच्या मागण्या आज मान्य न झाल्यास त्यांनी उद्या, 15 जूनला देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापासून उपोषणाला बसण्याचा इशाराही या जवानांनी दिला आहे.

माजी लष्करी जवानांचे प्रतिनिधी गेल्या दहा दिवसांपासून सरकारशी बोलणी करत आहेत. पण, या बोलणीतून फक्त आश्वासनं मिळाली, ठोस निर्णय झालेला नाही, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. आंदोलकांचे प्रतिनिधी आज दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचीही भेट घेणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2015 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close