S M L

आप सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये 'जंग' सुरूच

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2015 09:20 AM IST

najib jang vs kejriwal4415 जून : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातला वाद सुरूच आहे. आता निमित्त आहे ते दिल्लीच्या गृह सचिवांचं...नायब राज्यपाल नजीब जंग यांनी नियुक्त केलेले गृह सचिव धरम पाल यांनी आपलं कार्यालय खाली करायचे आदेश देण्याचा विचार दिल्ली सरकार करतंय.

दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी या आशयाचं पत्र लिहिलंय, ते उद्या पाल यांना पाठवलं जाऊ शकतं. पण, मी गृह सचिव म्हणून काम करत राहणार, आणि कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा पाल यांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारनं पाल यांची हकालपट्टी केलीय. दिल्ली अँटी करप्शनच्या अध्यक्षपदी एम के मीणा यांच्या नावाची अधिसूचना काढल्याबद्दल त्यांना काढून टाकण्यात आलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2015 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close