S M L

सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा -राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2015 11:13 AM IST

etv_rahul_gandhi_interview16 जून : ललित मोदी-सुषमा स्वराज प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढवलाय.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच ललित मोदी यांची पाठराखण करत असल्याचा आरोप केलाय. तसंच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा भाजपने राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी आणि ललित मोदी एकत्र बसल्याचा एक फोटोही काँग्रेसने प्रसिद्ध केला. प

ण, हा 2010 सालच्या आयपीएल मॅचमधला फोटो आहे, असं सांगत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा मुद्दा खोडून काढला.

स्वराज यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असंही जावेडकरांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी सुषमा स्वराज यांनी अजून आपलं मौन सोडलेलं नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2015 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close