S M L

राजपथावरचा योगउत्सव गिनीज बुकात ?

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2015 03:19 PM IST

राजपथावरचा योगउत्सव गिनीज बुकात ?

21 जून : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने लष्कराचे संचलन होणार्‍या दिल्लीतील राजपथवर आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. या योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 37 हजार जणांनी राजपथवर योग केलं. 37 हजार लोकांच्या सहभागीची आता गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. राजपथावर योग आयोजकांनी याबाबत गिनीज रेकॉर्डसाठी निवेदन पाठवलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून जाहीर केल्यानंतर आज देशभरात मोठ्या उत्साहात पहिलाच योग दिन साजरा होत आहे. या योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल 37 हजार जणांनी राजपथवर योग केलं. विजय चौकापासून ते इंडिया गेटपर्यंतच्या दीड किलोमीटरचा राजपथचा परिसर हा 'योग परिसर' बनला होता.

35 मिनिटांच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री या कार्यक्रमात सहभागी होते. तब्बल 37 हजार लोकांना योग करून एक नवा विक्रम केलाय. हा विक्रम आता गिनीज बुकात जाणार आहे. या अगोदर हा रेकॉर्ड विवेकानंद केंद्राच्या नावे आहे. 19 नोव्हेंबर 2005 साली ग्वालियरमध्ये झालेल्या योग कार्यक्रमात 29 हजार 973 लोक सहभागी झाले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2015 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close