S M L

मालवणी दारूकांड प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक

Sachin Salve | Updated On: Jun 23, 2015 07:02 PM IST

98arrest23 जून : 104 जणांचा बळी घेणार्‍या मालवणी विषारी दारू प्रकरणातल्या मुख्य आरोपी आतिकला अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांनी ही अटकेची कारवाई करून आरोपीना मुंबई क्राईम ब्राँचच्या हवाली करण्यात येणार आहे.

आतिक दिल्लीतून हे सगळं दारूचं रॅकेट चालवत असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मालवणीमधल्या दारूसाठी वापरण्यात आलेला कच्चा माल गुजरातहून आल्याचंही स्षष्ट झालंय. पण हा अधिकचा कच्चा माल योग्य वेळी जप्त करण्यात आला नाहीतर यातल्या मृतांचा आकडा वाढला असता.

दहिसरमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात 68 ड्रम्स भरून कच्चा माल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आलीय. अटकेत असणारा आरोपी फ्रान्सिस डिमेलो याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात येतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2015 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close