S M L

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींमध्ये बंद दाराआड चर्चा

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2015 11:37 PM IST

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींमध्ये बंद दाराआड चर्चा

25 जून : फडणवीस सरकार सत्तेवर विराजमान होऊन वर्ष ही उलटत नाही तेच बोगस पदवी, चिक्की घोटाळ्यामुळे वादात सापडलंय. या प्रकरणाची आता भाजप हायकमांडने दखल घेतलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बंद खोलीत चर्चा झालीये. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुमारे 10 मिनिटे चर्चा झाली. पंतप्रधानांनी तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त प्रकरणाची मुख्यमंत्र्याकडून माहिती घेतल्याचं कळतंय.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी यामुळे फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली. एवढेच नाहीतर महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यात 206 कोटींची खरेदी व्यवहार झाल्यामुळे विरोधकांनी एकच टिकेची झोड उठवलीये. विरोधकांच्या एकापाठोपाठ आरोपांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची चांगलीच दमछाक झालीये.

विनोद तावडेंचं बोगस पदवी प्रकरण आणि पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जोरदार पाठराखण केली खरी पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही बाब जरा खटकलीये. नाशिकच्या कुंभमेळ्याचं निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेले होते. त्यावेळी मोदींनी राज्याचा हालहवाला मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये साधारण 10 मिनिटे चर्चा झाली. यावेळी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या प्रकरणाची मोदींनी मुख्यमंत्र्यांकडून माहिती जाणून घेतली. पण, मुख्यमंत्र्यांना काय निर्देश देण्यात आले याबाबत माहिती कळू शकली नाही. मुख्यमंत्र्यांनीही यावर कोणताही प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2015 11:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close