S M L

मन की बातमध्येही ललितगेट प्रकरणी मौन कायम

Samruddha Bhambure | Updated On: Jun 28, 2015 03:49 PM IST

modi man ki baat

28 जून : ललित मोदी प्रकरणावरून देशातील वातावरण सध्या तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात'मध्ये काय बोलतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष होतं. पण, त्यांनी त्या मुद्यावर मौन बाळगत योग दिनाचे गुणगान कायम ठेवलं. रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) देशभरातील जनतेशी संवाद सधला.

सध्या देशात आयपीएलमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी फरारी आरोपी ललित मोदी यांच्यावरून सुषमा स्वराज, वसुंधरा राजे या भाजपा नेत्या अडचणीत सापडलेल्या आहेत. असं असतानाही पंतप्रधानांनी आजही या विषयाबद्दल एकही अवाक्षर काढले नाही. तसंच चिक्की घोटाळाप्रकरणी अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेच्या मुद्यावरही ते काहीही बोलले नाहीत. तर या उलट आजच्या 'मन की बात'मध्ये त्यांनी गेल्या आठवड्यात साजरा झालेला योग दिन, त्याला जगभरातून मिळालेला प्रतिसाद, तसंच जलसंवर्धन आणि बेटी बचाओ मोहीम अशा विषयांवर भाष्य केलं.

'21 जून रोजी झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय यशस्वी झाला असला तरी ती एक नवी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. त्या दिवशी जिथे जिथे सूर्याची किरणे पोचली तिथे सगळीकडे योगदिन उत्साहात साजरा झाला. जगभारतील देशांनी योगदिन साजरा करत 'योगचा' गौरव केला असं ते म्हणाले. तसंच 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहिमेसाठी टॅगलाईन पाठवण्यास सांगत #selfiewithdaugher या हॅशटॅगने आपल्या मुलीसोबतचा फोटो पोस्ट करण्याचे आवाहनही त्यांनी देशभरातील नागरिकांना केले.

यावेळी त्यांनी देशवासियांना पाणी बचतीचं महत्त्वही सांगितलं. पावसाळ्यासारखा आल्हाददायक ऋतू सर्वांनाचा आवडतो, पण पाणी हे आपले जीवन असून त्याची बचत व संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाण्याची बचत करणे गरजेच असल्याचे सांगत युवक आणि सामाजिक संस्थांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2015 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close