S M L

मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचे 40 बळी?

Samruddha Bhambure | Updated On: Jun 29, 2015 09:04 PM IST

मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याचे 40 बळी?

29 जून : मध्यप्रदेशातला व्यापम घोटाळ्याने आता अख्ख्या सरकारला आणि राजभवनालाही व्यापलं आहे. काल आणखी एका आरोपीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. आतापर्यंत 39 आरोपी आणि साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झालाय. आज चाळिसावा मृत्यू झाल्याने मध्यप्रदेशात खळबळ माजली आहे

डॉ नरेंद्र तोमर, मध्य प्रदेशातल्या मुरैना जिल्ह्यातला पशुवैद्यक. गेल्या 2 वर्षांपासून राज्यात गाजत असलेल्या व्यापक घोटाळा प्रकरणी त्याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली. 30 वर्षांच्या नरेंद्रचा हार्टऍटॅकने मृत्यू झालाय, असं प्रशासनाने सांगितलंय. आतापर्यंत या प्रकरणी झालेला हा चाळिसावा संशयास्पद मृत्यू आहे. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी आरोप केलाय की डॉ नरेंद्रचा खून करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या काँग्रेसने नरेंद्रच्या घरच्यांची री ओढलीये. या घोटाळ्याची ज्यांना खरी माहिती आहे, त्यांचा काटा काढला जातोय, असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

हा मृत्यूही नैसर्गिक असून त्याचा व्यापम घोटाळ्याशी संबंध नाही, असा दावा सत्ताधारी भाजपने केलाय.

काय आहे नेमका घोटाळा?

 • मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने चार वर्षांपूर्वी घेतलेल्या परीक्षेत आणि नेमणुकांत मोठा गैरव्यवहार झाला
 • खर्‍या विद्यार्थ्यांच्या जागी तोतया विद्यार्थी बसवण्यात आले
 • निकषांत न बसणार्‍या उमेदवारांची भर्ती करण्यात आली
 • इंजिनियरिंग व मेडिकलशी संबंधित कोर्सेसमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला
 • राज्यपाल राम नरेश यादव यांनाही आरोपी करण्यात आलं होतं, पण राज्यपाल असल्यामुळे त्यांचं नाव काढण्यात आलं
 • राज्यपालांचा मुलगाही आरोपी होता, त्याचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला
 • आतापर्यंत 40 आरोपी आणि साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झालाय
 • मध्य प्रदेश हायकोर्टाने विशेष तपास पथकाकडे तपास सोपवलाय

काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे

स्मृती इराणी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि पंकजा मुंडे यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांमुळे केंद्र, राजस्थान आणि महाराष्ट्रातली भाजप सरकारं अडचणीत आली आहेत. त्यात व्यापम घोटाळ्याचा व्याप वाढल्यामुळे मध्य प्रदेशातलं शिवराज सिंह चौहान सरकारही घेरलं जातंय.

व्यापम घोटाळ्याचे 40 बळी!

 • म.प्र. व्यावसायिक परीक्षा मंडळाने 4 वर्षांपूर्वी घेतलेल्या परीक्षेत आणि नेमणुकांत मोठा गैरव्यवहार
 • खर्‍या विद्यार्थ्यांच्या जागी तोतया विद्यार्थी बसवले
 • निकषांत न बसणार्‍या उमेदवारांची भर्ती
 • इंजिनियरिंग व मेडिकलशी संबंधित कोर्सेसमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश
 • राज्यपाल राम नरेश यादव यांनाही आरोपी करण्यात आलं, पण नंतर नाव वगळलं
 • राज्यपालांचा मुलगाही आरोपी, त्याचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
 • आतापर्यंत 40 आरोपी आणि साक्षीदारांचे संशयास्पद मृत्यू
 • मध्य प्रदेश हायकोर्टाने विशेष तपास पथकाकडे तपास सोपवला
 • काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2015 09:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close