S M L

लिबरहान आयोगाचा अहवाल लोकसभेत सादर

24 नोव्हेंबर मनमोहन लिबरहान आयोगाचा अहवाल मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. बाबरी मशीद उद्‌ध्वस्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तब्बल 17 वर्षानंतर आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. हा अहवाल फक्त इंग्रजीतच सादर करण्यात आला आहे. मात्र हा अहवाल लोकसभेत सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे सोमवारी लोकसभेत मोठा गोंधळ झाला होता. आता या अहवालावर गुरुवारी लोकसभेमध्ये चर्चा होणार आहे. राज्यसभेत अहवाल सादर होताच गोंधळ सुरू झाला. 'जय श्रीराम'च्या घोषणा देत भाजपच्या सदस्यांनी सभागृहातल्या मोकळ्या जागेत धाव घेतली. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणारे समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली. अहवाल हिंदी भाषेत सादर करावा अशी जोरदार मागणी यावेळी सदस्यांनी केली. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.आयबीएन-नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार लिबरहान आयोगाच्या अहवालात अनेकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.अहवालात तक्तालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. बाबरी मशीद वाचवण्यासाठी नरसिंहराव यांनी पुरेसे प्रयत्न केलं नसल्याचं म्हटलं आहे.संघ परिवारातल्या नेत्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. विनय कटियार, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांनी सक्रियपणे बाबरी मशीद पाठण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचं यात म्हटलं आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्यावरही अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. बाबरीच्या विध्वंसकाना सरकारने रोखलं नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.लिबरहान रिपोर्टमधील काही महत्त्वाच्या बाबी : अटलबिहारी वाजपेयींना क्लीन चिट नाही.वाजपेयींची तथाकथित मवाळ भूमिका फसवी असल्याचं अहवालात म्हटलंय. रा.स्व.संघाच्या कृतीबाबत वाजपेयी आणि अडवाणींना आधीच माहिती होती. कल्याणसिंग आणि तत्कालीन उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळालाही दोषी धरण्यात आलं आहे.कल्याणसिंग यांनी रा.स्व.संघाची मनमानी खपवून घेतली.कल्याणसिंग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टासमोर खोटं बोलले.लिबरहान आयोगाने केंद्राच्या गुप्तचर यंत्रणांवरही ठपका ठेवला आहे. मात्र नरसिंहराव यांना क्लिन चीट देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2009 08:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2009 08:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close