S M L

खासदारांचे 'अच्छे दिन', दुप्पटीने वाढणार पगार?

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2015 12:05 PM IST

खासदारांचे 'अच्छे दिन', दुप्पटीने वाढणार पगार?

02 जुलै : एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत आहेत तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी लाखभर पगारासाठी पुढे सरसावले आहे. संसदेच्या एका समितीने खासदारांच्या पगारवाढीसाठी प्रस्ताव सादर केलाय. खासदारांचा पगार दुपट्टीने वाढवण्यात यावा अशी शिफारस यात करण्यात आलीये. या शिफारसीमुळे खासदारांना वर्षाला 57 लाख पगार मिळण्याची शक्यता आहे. तसंच माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये 75 टक्के वाढ करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आलीये.

केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्ताव समितीने सरकारी कर्मचार्‍यांना ज्या प्रकारे पे कमिशन म्हणजे 'रिविजन मॅकनिस्म' लागू आहे हाच मात्र खासदारांना लागू करावा अशीही मागणी करण्यात आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या समितीने केंद्राकडे तब्बल 60 प्रस्ताव सादर केले आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2010 ला खासदारांच्या पगारात शेवटची वाढ करण्यात आली होती असा दावा समितीने केलाय.

विशेष म्हणजे, सिलेंडरवर मिळणारी सबसिडी घेऊ नये असं आवाहन खासदार करतात तर दुसरीकडे हेच खासदार आता पगारात दुपट्टीने वाढ मागत आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान, खासदारांना देण्यात येणार्‍या 2 हजारांच्या भत्त्यात वाढ करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे. संसदेच्या कँटीनमध्ये खासदारांना सर्वात कमी दरात जेवण उपलब्ध असल्याची बाब समोर आल्यामुळे यावर बरात वाद झाला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2015 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close