S M L

मुख्यमंत्र्यांच्या विमान उशिरा प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने मागितली माहिती

Sachin Salve | Updated On: Jul 3, 2015 12:38 PM IST

cm on media 34523403 जुलै : विमानाला उशीर झाल्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून याबद्दल खुलासा मागितला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे सचिव प्रविणकुमार परदेशी व्हिसाची कागदपत्र विसरल्यामुळे अमेरिकेला जाणारं हे विमान तब्बल सव्वा तास रखडलं होतं. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्यामुळे अखेर पंतप्रधान कार्यालयाला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. पंतप्रधान कार्यालयानं या संदर्भात माहिती मागवून घेतलीये. मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्र्यानी या संदर्भात चुकीचे आरोप होत असल्याचं म्हटलंय, मी वेळेतंच विमानात बसलो होतो असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. माध्यमांनी दाखवलेल्या बातम्यांमुळे मुख्यमंत्री चांगलेच संतापले असून मायदेशी परतल्यावर मानहानीचा दावा ठोकणार असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यांनी दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2015 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close