S M L

शरद पवारांमुळे दाऊद भारतात येऊ शकला नाही -जेठमलानी

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2015 06:07 PM IST

शरद पवारांमुळे दाऊद भारतात येऊ शकला नाही -जेठमलानी

04 जुलै : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी गृहखाते नेहमी बाह्या वर सरसावते खरं पण, दाऊद काही हाती लागलेला नाही. पण, दाऊद भारतात परतणार होता पण, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी परतीच्या प्रस्तावर कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे दाऊर परत येऊ शकला नाही असा दावा ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केलाय. हा प्रस्ताव घेऊन शकीलनं मलाच फोन केला होता, असं खुलासाही जेठमलानींनी केलाय.

दाऊदचा राईट हॅण्ड छोटा शकीलने शुक्रवारी 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राला फोन करून मुलाखत दिली आणि 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत माहिती दिली. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर दाऊद आणि शकील यांना भारतात परतायचं होतं. त्यासाठी त्याने काही अटी घातल्या होत्या. पण, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार सरकारनं त्यावर काहीच कारवाई केली नाही. सुरुवातीला हा प्रस्ताववर मंजूर होईल अशी पाऊल सरकारने उचलली होती पण, त्यानंतर पवारांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे प्रस्ताव रखडला गेला.

भारतात परतल्यानंतर आपला छळ केला जाईल, कठोर कारवाई केली जाईल अशी भीती दाऊदला होती. त्यामुळे भारतात परतल्यावर खटला सुरू असताना मुंबईतील राहत्या घरीच नजरकैद करावे अशी मागणी दाऊद केली होती अशी माहिती शकीलने दिली. शकील म्हणतो, त्यावेळी दाऊदने लंडनमध्ये राम जेठमलानी यांच्याशी चर्चाही केली होती आणि भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.

राम जेठमलानी यांनीही शकीलच्या खुलाशाला दुजोरा दिलाय. दाऊदला भारतात परतायचं होतं. तसा प्रस्ताव राज्य सरकारने मांडण्यात आला होता आणि हा प्रस्ताव तसाच राहिला असा दावा राम जेठमलानी यांनी केलाय. हा प्रस्ताव घेऊन शकीलनं मलाच फोन केला होता, असं जेठमलांनींनी केलाय. आमच्या परत येण्यामध्ये लालकृष्ण अडवाणींनीही अडथळे निर्माण केले होते, असा आरोप शकीलनं केलाय.

विशेष म्हणजे, राज्य सरकारने दाऊदच्या अटी मंजूर करण्याची कोणतीही हमी दिली नव्हती, दाऊदचे लाड करायचे नाही असा पवित्राच राज्य सरकारने घेतला होता, त्यामुळे हा प्रस्ताव रखडला आणि दाऊदची 'घरवापसी' टळली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2015 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close