S M L

व्यापम घोटाळ्याचं कव्हरेज करणार्‍या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2015 09:10 PM IST

व्यापम घोटाळ्याचं कव्हरेज करणार्‍या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

04 जुलै : व्यापम घोटाळ्याचं कव्हरेज करणार्‍या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झालाय. अक्षय सिंह असं या पत्रकाराचं नाव असून तो 'आज तक' या वृत्तवाहिनीचा पत्रकार होता. काही दिवसांपासून अक्षय सिंह मध्यप्रदेशमध्ये व्यापम घोटाळ्याच्या तपासाचं कव्हरेज करण्यासाठी आला होता. या घोटाळ्यामधील अनेक साक्षीदांराचा मृत्यू झालाय. व्यापम घोटाळ्यात मृतांचा आकडा आता 41 वर पोहचलाय.

अक्षय सिंह यांनी आज घोटाळ्यातील पीडितांच्या पालकांची मुलाखत घेतली. मुलाखत झाल्यानंतर अक्षय यांच्या तोंडातून अचानक फेस यायला लागला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर प्रकृती चिंतानजनक असल्यानं खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र शेवटी अक्षयला गुजरातच्या दाहोदच्या रुग्णालयात पाठवलं, मात्र तिथ त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यावर चौकशीला सुरुवात होईल असं दाहोदच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितलंय.

काय आहे हा घोटाळा

- मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने चार वर्षांपूर्वी घेतलेल्या परीक्षेत आणि नेमणुकांत मोठा गैरव्यवहार झाला

- खर्‍या विद्यार्थ्यांच्या जागी तोतया विद्यार्थी बसवण्यात आले

- निकषांत न बसणार्‍या उमेदवारांची भर्ती करण्यात आली

- इंजिनियरिंग व मेडिकलशी संबंधित कोर्सेसमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला

- राज्यपाल राम नरेश यादव यांनाही आरोपी करण्यात आलं होतं, पण राज्यपाल असल्यामुळे त्यांचं नाव काढण्यात आलं

- राज्यपालांचा मुलगाही आरोपी होता, त्याचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला

- आतापर्यंत 40 आरोपी आणि साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झालाय

- मध्य प्रदेश हायकोर्टाने विशेष तपास पथकाकडे तपास सोपवलाय

- काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2015 08:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close