S M L

व्यापम घोटाळा : चार दिवसांतला चौथा बळी?

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2015 09:26 AM IST

Vyapam scam s

07 जुलै : व्यापम घोटाळ्यातील बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो आहे. तिगमगढ जिल्ह्यात ओरछा गावातील पोलिस कॉन्स्टेबल रमाकांत पांडेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मध्य प्रदेशच्या ओर्छा भागात ही घटना घडली आहे. या घोटाळ्याची चौकशी करणार्‍या स्पेशल टास्क फोर्सनं पांडेंची चार महिन्यांपूर्वी उलटतपासणी केली होती. पण टिकमगड जिल्ह्याचे एसपी निमिश अग्रवाल यांचं असं म्हणणं आहे, की पांडे यांना दारूचं व्यसमन होतं, त्यांच्यावर खूप कर्ज होतं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी. या मृत्यूचा व्यापम घोटाळ्याशी संबध असल्यास या प्रकरणातला हा 49वा बळी ठरेल.

रमाकांत पांडे यांनी पंख्याला लटकून स्वता:ला संपवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. व्यापम घोटाळ्याशी संबंधित गेल्या तीन दिवसात 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. पत्रकार, त्यानंतर जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि काल एका प्रशिक्षणाथी महिला पोलिस कॉन्स्टेबलनी आत्महत्या करत स्वत:ला संपवलं.

दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज घोटाळ्यातल्या सीबीआय तपासाच्या मागणीबाबत सुनावणी होणार आहे. या घोटाळ्याची सीबीआय तर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी काल (सोमवारी) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळली होती.

सध्या मध्य प्रदेश हायकोर्टाच्या देखरेखी खाली चौकशी सुरू आहे आणि हा तपास योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण, नुकत्याच उघडकीला आलेल्या संशयास्पद मृत्यूंनतर या प्रकरणात सखोल तपास करण्याची गरज असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तसंच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेसनं केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close