S M L

अविवाहित आई होणार आपल्या मुलांची एकमेव अधिकृत पालक - सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2015 10:17 AM IST

Supreme court of india

07 जुलै : 'अविवाहित आईला मुलाच्या वडिलांची संमती घेण्याची गरज नसून ती त्याची कायदेशीर पालक बनू शकते,' असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिला. यामुळे 'लिव्ह इन' किंवा विवाहापूर्वीच आई बनलेल्या मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात एका अविवाहित महिलेने तिच्या मुलाच्या पित्याचे नाव उघड न करता पालकत्व मिळावे; तसंच त्यासाठी पित्याची परवानगी मिळावी, यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यावर निकाल देताना न्या. विक्रमजित सेन यांच्या नेतृत्त्वाखालील पीठाने सांगितलं की, संबंधित पाल्याचे वडील कोण आहेत, याची ओळख जर महिलेला उघड करायची नसेल, तर त्यालाही हरकत घेता येणार नाही. तसंच कायदेशीर कागदपत्रांवर वडिलांच्या नावाचा उल्लेख न करताही संबंधीत महिला पाल्याची एकमेक पालक म्हणून त्याचा सांभाळ करू शकते. त्यामुळे 'लिव्ह इन रिलेशनशिप' च्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close