S M L

व्यापम घोटाळा : अखेर मध्य प्रदेश सरकार सीबीआय चौकशीसाठी तयार

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2015 04:12 PM IST

व्यापम घोटाळा : अखेर मध्य प्रदेश सरकार सीबीआय चौकशीसाठी तयार

07 जुलै : व्यापम घोटाळ्या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारनं अखेर सीबीआय चौकशीची तयारी दाखवली आहे. सध्या मध्यप्रदेश हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. मात्र, आता याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश निवेदन हायकोर्टाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.

तसंच व्यापम घोटाळ्याचं निमित्त करून विरोधक माझी प्रतिमा मलीन करत आहेत, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. तसंच मला काम करू न देण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान,, या घोटाळ्यासंबंधी आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. रमाकांत पांडे या पोलीस हवालदाराचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडलाय. मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्यातल्या ओर्छा तालुक्यात ही घटना घडलीये. या घोटाळ्याची चौकशी करणार्‍या स्पेशल टास्क फोर्सनं पांडेंची चार महिन्यांपूर्वी उलटतपासणी केली होती.

पण, टिकमगड जिल्ह्याचे एसपी निमिश अग्रवाल यांचं असं म्हणणं आहे, की पांडे यांना दारूचं व्यसन होतं, त्यांच्यावर खूप कर्ज होतं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली असावी. गेल्या चार दिवसांतला हा घोटाळ्यासंबंधी चौथा मृत्यू आहे. जबलपूरच्या मेडिकल कॉलेजचे डीन, एक पोलीस उपनिरीक्षक महिला आणि आज तकचा एक पत्रकार यांचा नुकताच मृत्यू झालाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close