S M L

सदानंद गौडा म्हणतात, 'व्यापम' सारख्या फालतू विषयावर पंतप्रधान बोलणार नाही'

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2015 09:49 PM IST

सदानंद गौडा म्हणतात, 'व्यापम' सारख्या फालतू विषयावर पंतप्रधान बोलणार नाही'

07 जुलै : व्यापम घोटाळा हा साधा आणि फालतू विषय आहे, त्यावर पंतप्रधान बोलणार नाही अशी मुक्ताफळं केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी उधळलीये. व्यापम घोटाळ्यात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झालाय. पण, तरीही कायदा मंत्र्यांना याची जाण नसावी असं बेजाबदारीचं वक्तव्य केलंय.

व्यापम घोटाळ्या प्रकरणी एकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सीबीआय चौकशीची तयारी दाखवत असताना केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी मात्र नको ती मुक्ताफळं उधळली आहेत. व्यापम घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनपर्यंत मौन का बाळगलं आहे असा सवाल विरोधक करत आहेत. त्यांना उत्तर देताना, पंतप्रधान अशा फालतू गोष्टींवर बोलत नाहीत असं सदानंद गौडा यांनी म्हटलंय. व्यापम हा साधा आणि फालतू मुद्दा आहे असं देशाच्या कायदामंत्र्यांनी म्हटलंय. या घोटाळ्याशी संबंधित किंवा त्याचा तपास करणार्‍या अशा 49 जणांचा मृत्यू झालाय. आणि तरीही देशाच्या कायदामंत्र्यांना हा घोटाळा फालतू वाटतोय.

दरम्यान, व्यापम घोटाळ्याप्रकरणी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भोपाळमध्ये शर्ट काढून आंदोलन केलं. व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close