S M L

अझीम प्रेमजींनी विप्रो कंपनीतील 18 टक्के शेअर्स केले दान

Samruddha Bhambure | Updated On: Jul 9, 2015 10:29 AM IST

अझीम प्रेमजींनी विप्रो कंपनीतील 18 टक्के शेअर्स केले दान

09 जुलै : आयटी क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी आपल्या विप्रो कंपनीतील निम्मी संपत्ती सेवाभावी संस्थानांना दान केली आहे. चांगल्या समाजनिर्मितीसाठी आयटी क्षेत्रातीव बाकीच्या कंपन्यांनीसुद्धा योगदान द्यावं, असं आवाहनही प्रेमजी यांनी केलं आहे.

विप्रो ही भारतातील तिसर्‍या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. प्रेमजी यांनी या कंपनीतील निम्मी संपत्ती म्हणजेच 53 हजार 284 कोटींचे शेअर्स समाजसेवेसाठी संस्थांना दान केले आहे. या माध्यमातून त्यांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close