S M L

व्यापम घोटाळ्यात बेपत्ता कॉन्स्टेबलचा मृत्यू -दिग्विजय सिंह

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2015 04:26 PM IST

11-digvijay-singh-60209 जुलै : व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशीचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहे. पण, या प्रकरणातला गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललाय. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी या घोटाळ्यातला साक्षीदार आणि कॉन्स्टेबल संजय यादवचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केलाय.

कॉन्स्टेबल संजय यादव याला काल सुनावणीसाठी भोपाळ कोर्टात हजर व्हायचं होतं. मात्र, तो कोर्टात गेलाचं नाही. तो बेपत्ता आहे. संजय यादव हा माजी विशेष अधिकारी धनराज यादव यांच्या जवळचा मानला जातो.

दरम्यान, मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी व्यापम प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची तयारी दाखवलीये. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू होता. मात्र, जन भावनेचा आदर करत आम्ही ही भूमिका घेतल्याचंही गौर यांनी सांगितलं. तर भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनीही राज्य सरकारनं व्यापम संबंधी सीबीआय चौकशी करण्याची भूमिका योग्य वेळीच घेतल्याचं म्हटलंय.

काय आहे घोटाळा ?

- मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने चार वर्षांपूर्वी घेतलेल्या परीक्षेत आणि नेमणुकांत मोठा गैरव्यवहार झाला

- खर्‍या विद्यार्थ्यांच्या जागी तोतया विद्यार्थी बसवण्यात आले

- निकषांत न बसणार्‍या उमेदवारांची भर्ती करण्यात आली

- इंजिनियरिंग आणि मेडिकलशी संबंधित कोर्सेसमध्ये अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला

- राज्यपाल राम नरेश यादव यांनाही आरोपी करण्यात आलं होतं, पण राज्यपाल असल्यामुळे त्यांचं नाव काढण्यात आलं

- राज्यपालांचा मुलगाही आरोपी होता, त्याचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला

- आतापर्यंत 48 आरोपी आणि साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झालाय

- मध्य प्रदेश हायकोर्टाने विशेष तपास पथकाकडे तपास सोपवलाय

- काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2015 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close