S M L

चिमुरड्याच्या ह्रदयातून काढला पेन्सिलचा तुकडा

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2015 10:22 AM IST

 चिमुरड्याच्या ह्रदयातून काढला पेन्सिलचा तुकडा

14 जुलै : हैदराबादच्या मॅक्सक्युअर हॉस्पिटलमध्ये अलिकडेच एक अवघड ऑपरेशन करण्यात आलं. त्यामध्ये एका सहा वर्षांच्या लहान मुलाच्या हृदयातून पेन्सिलचा तुकडा काढण्यात आला. चरण असं या मुलाचं नाव आहे.

चरण त्याच्या आई-वडिलांसह नसरमपेट या गावात राहतो. शाळा सुटल्यानंतर चरण पळत पळत घरी जात होता. तेव्हा तो पडला आणि त्यावेळी अनपेक्षितपणे पेन्सिलचा तुकडा त्याच्या हृदयात गेला. चरणच्या आईवडिलांनी त्याला वारंगळमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथून त्याला हैदराबादला हलवण्यात आलं. स्कॅनिंग केल्यानंतर सर्जन समीर दिवाळे यांनी सर्जरी करून त्याच्या हृदयातली पेन्सिल काढून टाकली आणि हृदयाला पडलेलं छिद्रही बुजवलं. सर्जरीनंतर चरणची प्रकृती स्थिर असल्याचं हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं. त्याला लवकरच घरी पाठवण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close