S M L

आंध्रात 'गोदावरी पुष्करम' सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरीत 19 ठार

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2015 02:43 PM IST

आंध्रात 'गोदावरी पुष्करम' सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरीत 19 ठार

14 जुलै : : आंध्र प्रदेशच्या राजामुंद्री शहरात झालेल्या चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू झालाय, तर 31 जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गोदावरी पुष्करम या सोहळ्यादरम्यान ही दुखद घटना घडलीय. आज सिंहस्थ आहे, आणि यामुळे आंध्र आणि तेलंगणामध्ये नद्यांची आराधना केली जाते. त्याच दरम्यान ही घटना घडली आहे.

आज सिंहस्थनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी भाविक गोदीवरी नदीकडे जात असताना ही चेंगराचेंगरी झाली. मृतांमध्ये वृद्ध, महिलांचा समावेश आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या नदींच्या पुजेला 'गोदावरी पुष्करम' असं म्हटलं जातं, 144 वर्षांमधून एकदाच हा योग येतो. त्यामुळेच सिंहस्थच्या निमित्ताने भाविकांनी आज सकाळपासून एकच गर्दी केली होती. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भाविकांना घाटापासून दूर राहण्याचं आवाहन पोलीस करत आहे. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी घटनेचा माहिती मागवली असून पोलिसांची कुमक वाढवण्यात आलीये. काही भाविकांना किरकोळ जखमा झाल्यामुळे प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलंय. मात्र, सुरुवातीला मृतांचा आकडा हा 7 होता त्यानंतर तो 19 वर पोहचलाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे घटनास्थळी पोहोचलेत. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत सरकारनं जाहीर केलीये. तर पुष्कर पर्व संपेपर्यंत पुष्कर घाटावरच मुख्यमंत्री मुक्काम करतील असंही सरकारकडून सांगितलं गेलंय.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2015 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close