S M L

यंदाचे शतक आयआयटीचं नव्हे तर आयटीआयचं - नरेंद्र मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 15, 2015 09:53 PM IST

यंदाचे शतक आयआयटीचं नव्हे तर आयटीआयचं - नरेंद्र मोदी

15 जुलै : गेल्या शतकात आयआयटीने भारताच्या विकासात योगदान दिलं असलं तरी हे शतक आयटीआयचं असेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आयटीआयच्या छोट्या छोट्या शाखांमध्ये लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यास रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीत आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्किल इंडिया मिशनची सुरवात झाली. यावेळी मोदींनी अनेक उदाहरण देत कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिलं. या योजनेत 2022 पर्यंत 50 कोटी लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. तसंच स्किल इंडिया मिशनचा गरीबाला फायदा होणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

कौशल्य विकासाचं प्रमाणपत्र हे इंजिनियरच्या प्रमाणपत्राऐवढेच महत्त्वाचे असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. जगभरातील मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याची क्षमता फक्त भारतामध्येच असून आपण यासाठी सज्ज राहणं गरजेचं आहे. यासाठीच स्कल इंडिया मिशन सुरु केल्याचं मोदींनी सांगितलं. या प्रशिक्षणामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढेल असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2015 09:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close