S M L

काश्मीरमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 17, 2015 12:09 PM IST

काश्मीरमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू

17 जुलै : काश्मीर आणि उत्तराखंडला पावसाचा तडाखा बसलाय. काश्मिरमध्ये श्रीनगर-लेह मार्गावर सोनमर्गजवळ झालेल्या ढगफुटीमुळे एका जणाचा मृत्यू झालाय. तसंच तुफान पावसाने राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झालंय.

उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाने जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक रस्ते बंद झालेत. डेहराडून ते मसूरी मार्गाची अवस्था खराब आहे. पावसामुळे अमरनाथ आणि कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आल्यात. येत्या 36 तासात हवामान आणखी बिघडू शकतं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील वर्षीही काश्मिरमध्ये ढगफुटीमुळे मोठी हानी झाली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close