S M L

काश्मीरमध्ये फडकले पाकिस्तान, आयसिसचे झेंडे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 17, 2015 10:00 PM IST

काश्मीरमध्ये फडकले पाकिस्तान, आयसिसचे झेंडे

17 जुलै : जम्मू - काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज, शुक्रवारी सुरक्षा दलाचे जवान आणि फुटीरतावादी आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान आणि आयसिसचे झेंडे फडकावले. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधून तसंच देशभरातून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आज रमझानच्या महिन्यातला शेवटचा शुक्रवार होता. आज दुपारी श्रीनगर शहरातील नोहट्टा परिसरात जामा मशिदीमध्ये नमाझ झाल्यानंतर काही तरुणांच्या जमावाने झेंडे फडकावून पाकिस्तान आणि फुटीरवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर जमावाने दगडफेक केली. जमावाला शांत करण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, तसंच लाठीमारही केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2015 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close