S M L

भारताने पाठवलेली ईदची मिठाई पाकने नाकारली

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2015 11:04 PM IST

भारताने पाठवलेली ईदची मिठाई पाकने नाकारली

18 जुलै : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आजच्या दिवशीही कायम आहे. देशभरात ईद उत्साहात साजरी होत आहे पण, पाकिस्तानची नाराजगी ईदच्या दिवशीही कायम आहे. भारतीय जवानांनी ईदच्या निमित्ताने मिठाई पाठवली असता ती नाकारण्यात आली. त्यामुळे अटारी सीमा रेषेवर ईद साजरी केली गेली नाही.

अटारी सीमारेषेवर दरवर्षी ईद साजरी केली जाते. दोन्ही देशाचे जवान एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत मिठाईचं वाटप करता. आज ईदच्या निमित्ताने बीएसएफच्या अधिकारी आणि पाकिस्तानी अधिकार्‍यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानी अधिकार्‍यांनी चांगलीच आदळआपट केली. त्यांच्या अशा वागण्यामुळे बीएसएफच्या अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

ईदच्या दिवशी दोन्ही देशातील जवान एकमेकांना मिठाई देत असता पण यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी मिठाई दिलीच नाही. उलट भारतीय सैनिकांनी पाठवलेली मिठाईही परत पाठवून दिली. दरम्यान, सीमारेषेजवळ असलेल्या गावांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2015 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close