S M L

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2015 10:02 AM IST

modi3452356220 जुलै : संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या (मंगळवार)पासून सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे.

ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे अडचणीत आल्या आहेत. त्यंाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानं संसदेत सरकारला विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संध्याकाळी एन.डी.ए.ची बैठकही होणार आहे. वर्षभरात एनडीएची बैठकच न झाल्यानं भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अकाली दलानं नाराजी व्यक्त केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 08:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close