S M L

सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याचा भाव 25 हजाराखाली !

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2015 03:14 PM IST

सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याचा भाव 25 हजाराखाली !

20 जुलै : तुम्ही जर सोनं खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आताच सोनं खरेदी करून घ्या !, कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी मंदावल्यानं आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्यानं पाच वर्षातील नीचांकी दर गाठलाय. सोन्याचे भाव 25 हजारांपेक्षा खाली उतरले आहे.

सोन्याच्या आयातीवरील नियंत्रणावर सूट दिल्यानंतर सोन्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात दहा टक्क्यांपेक्षा जास्त घट झालेली आहे. आता तर सोन्याचे भाव पंचवीस हजारापेक्षा खाली उतरले आहेत. सध्या दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे चोवीस हजार नऊशे रुपये...हा दर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आणखी कमी होईल असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक शेअर बाजारातल्या घडामोडी आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून येतोय. लग्नाचा सीझन आणि सणासुदीच्या दिवसात सोन्याची मागणी वाढली तर सोन्याचे हे दर आणखी वाढू शकतात. सध्या दर कमी असताना सोन्यात गुंतवणुकीची ही चांगली संधी आहे असंही काही तज्ज्ञांचं मत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close