S M L

26/11 च्या हल्ल्याशी हुरियतचा संबंध?

Samruddha Bhambure | Updated On: Jul 20, 2015 10:39 PM IST

26/11 च्या हल्ल्याशी हुरियतचा संबंध?

20 जुलै : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याशी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी संबंध असल्याच्या पुराव्यांचे धागेदोरे मिळत आहे. हुरियत नेते फिरदोस अहमद शाह यांच्याकडे मुंबई हल्ल्यासंदर्भात अतिरेक्यांकडून 3 कोटी रुपये आल्याचे संदर्भ सापडले आहेत. त्यासंदर्भात गृहखात्याने इडीकडे दुसरा अहवाल मागवला आहे.

कश्मीर व्हॅलीच्या खटल्यासंदर्भात नुकताच अहवाल सादर केल्यानंतर, इडीने फिरदोस अहमद शाह यांना 2007 ते 2010 दरम्यान 3 कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला आहे. हा पैसा इटलीच्या ब्रेसिया शहरातील मदिना ट्रेडिंग ने पाठवला असून पाकव्याप्त काश्मिरातील जावेद इक्बाल हे पाठवणार्‍याचे नाव आहे. 2009 मध्ये इटली पोलिसांनी दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली होती. या कंपनीने इक्बालच्या नावावर किमान 300 वेळा पैसा पाठविला होता. एखाद्याच्या नावावर एवढ्या वेळा पैसा हस्तांतरित होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close