S M L

राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षापदासाठी इच्छुकांची वानवा

4 डिसेंबरराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला कुणी उत्सुक नाही. त्यामुळे रविवारच्या सभेत थेट अध्यक्ष निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या अध्यक्षपदासाठी मात्र अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे 6 डिसेंबरला ठरणार आहे. पण पक्षाचे राज्य निवडणूक अधिकारी मधुकर पिचड यांच्याकडे अजून एकही अर्ज आलेला नाही. यावरून लक्षात येतं की स्वतःहून राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद घ्यायला कुणीही उत्सुक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विजयसिंह मोहिते-पाटील, मधुकर पिचड आणि गोविंदराव आदिक यांची नावं चर्चेत आहेत. मात्र तब्येतीचं कारण देत मोहिते-पाटील यांनी हे पद आधीच नाकारलं आहे. पिचडही उत्सुक नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अनुभव गाठीशी असणार्‍या गोविंदराव आदिक यांचा या पदासाठी विचार होऊ शकतो. मुंबईतील उत्सुकांची फिल्डिंगप्रदेशाध्यक्षपदासाठी कुणी उत्सुक नसलं तरी मुंबई शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी ताकद पणाला लावली आहे. यात प्रदेश उपाध्यक्ष आणि कामगारनेते विजय कांबळे, खासदार संजय पाटील, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रकाश बिनसाळे, मुंबई सरचिटणीस नरेंद्र वर्मा, शिवाजी नलावडे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार आदींची नावं आघाडीवर आहेत. याशिवाय मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष नवाब मलिक यांचंही नाव चर्चेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2009 11:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2009 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close