S M L

याकूब फासावर लटकणारच !, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2015 03:46 PM IST

yakub memon21 जुलै : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन फासावर लटकणार हे आता निश्चित झालंय. याकूबच्या फाशीच्या शिक्षेची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीये. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे याकूबची फाशी आता अटळ आहे. येत्या 30 जुलैला याकूबला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये सकाळी 7 वाजेच्या सुमारास फासावर लटकवण्याची शक्यता आहे.

1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता. तर 713 जण गंभीर जखमी झाले होते. याकूबने दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे तसंच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणार्‍या इतर आरोपींनाही मदत केल्याचे तपासात निष्पन्न झालं होतं. टाडा कोर्टाने 2007 मध्ये याकूबला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर त्याने या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, सुप्रीम कोर्टानेही टाडा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. पण, तरीही फाशीच्या शिक्षेविरोधात याकूबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यामुळे फाशीची शिक्षा लांबली होती. पण, राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याने त्याच्या फाशीवर अखेरचं शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतरही याकूबची धडपड सुरूच होती. अखेर त्याने सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा धाव घेतली आणि पुनर्विचार याचिका दाखल केली. पण, कोर्टाने याचिका फेटाळून लावत फाशीचा मार्ग मोकळा करून दिला. आता याकूबपुढे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले असून फाशी अटळ आहे.

कोण आहे याकूब मेमन ?

याकूब हा 1993च्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार आणि प्रमुख आरोपी मुश्ताक ऊर्फ टायगर मेमन याचा भाऊ आहे. तो चार्टर्ड अकाऊंट आहे. टायगर मेमन सध्या फरार आहे. बॉम्बस्फोटासाठी जे पैसे पुरवण्यात आले होते त्याचा संपूर्ण व्यवहार याकूबने बघितला होता. याकूबच्या माहिम येथील घरी कट रचण्यात आला होता. याच घरी बॉम्बही बनवण्यात आले होते. याकूबला 1994 मध्ये काठमांडू विमानतळावरून अटक करण्यात आली होती. गेल्या 20 वर्षांपासून तो नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. टायगर मेमनचे सगळे अवैध धंदे तो सांभाळायचा. टाडा कोर्टाने 2007 मध्ये शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टानं क्युरेटीव्ह याचिका फेटाळली. बॉम्बस्फोट प्रकरणात याकूबसह एकूण 12 जणांना फाशीची शिक्षा विशेष न्यायलयाने सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने 12 पैकी 11 जणांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप सुनावली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close