S M L

गिलानींची नजरकैदेतून सुटका, मिळाला तात्पुरता पासपोर्ट

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2015 11:06 PM IST

गिलानींची नजरकैदेतून सुटका, मिळाला तात्पुरता पासपोर्ट

21 जुलै : फुटीरवादी हुरियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांना सौदी अरेबियासाठीचा तात्पुरता पासपोर्ट देण्यात आलाय. गिलानी यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सौदी अरेबियाला, जेद्दाला जायचं आहे. त्यासाठी त्यांना हा तात्पुरता पासपोर्ट देण्यात आलाय.

याआधी काश्मीरमध्ये आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावण्यात आले होते. त्यावरून काश्मीरमध्ये तणाव होता. काही ठिकाणी सुरक्षादलांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. अशा प्रकारे दगडफेक करणार्‍यांना हुरियतची फूस होती, असा सुरक्षा दलांचा दावा होता. या घटनांच्या काळात सय्यद अली शाह गिलानी यांना नजगरकैदेत ठेवण्यात आलं. पण त्यांना आता सौदी अरेबियाचा पासपोर्ट देण्यात

आलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2015 11:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close