S M L

माझा निवडणुक खर्च मर्यादीत - मुख्यमंत्री

5 डिसेंबर निवडणुकीच्या काळात मी कुणालाही जाहिरात दिलेली नाही. शिवाय निवडणूक खर्चाचा हिशोबही मी दिलेला आहे. माझा निवडणूक खर्च मर्यादेबाहेर असल्याचं भाजपने सिद्ध कराव असं आव्हान मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दिलं आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या 'पेड न्यूज' बातमीवर प्रदेश भाजपने तक्रार केली होती. 45 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास, निवडणूक आयोगालाच कोर्टात खेचण्याचा इशाराही भाजपने दिला होता. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आठ महिन्याच्या कारकिर्दीवर वर्तमानपत्रात पुरवण्या प्रसिद्ध केल्या होत्या. 'द हिंदु' या वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी माहितीच्या अधिकाराखाली हा पेड न्यूजचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर प्रदेश भाजपनंही राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देबाशिश चक्रवर्ती यांच्याकडे मुख्यमंत्री आणि नांदेडच्या निवडणूक अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2009 10:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2009 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close