S M L

जीएसटी विधेयकाचा मार्ग मोकळा, निवड समितीचं शिक्कामोर्तब

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2015 04:37 PM IST

जीएसटी विधेयकाचा मार्ग मोकळा, निवड समितीचं शिक्कामोर्तब

22 जुलै : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जीएसटी विधेयकाला मोठा दिलासा मिळालाय. राज्यसभेच्या निवड समितीनं जीएसटीवर शिक्कामोर्तब केलंय. या विधेयकातल्या सर्वच तरतुदींना निवड समितीनं पाठिंबा दिलाय.

जीएसटीमुळे होणार्‍या नुकसानासाठी राज्य सरकारांना पाच वर्षांसाठी भरपाई देण्याची तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांची मागणीही निवड समितीनं मान्य केलीय. दरम्यान, या विधेयकाला विरोध करणार्‍या काँग्रेसला मात्र धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलंय. संयुक्त जनता दलानंही जीएसटीला पाठिंबा दिलाय. एप्रिल 2016 पासून जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकाराचा इरादा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2015 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close