S M L

कृषीमंत्री म्हणतात, व्यसनं आणि प्रेमप्रकरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 04:29 PM IST

कृषीमंत्री म्हणतात, व्यसनं आणि प्रेमप्रकरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

radha mohan singh324 जुलै : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुन्हा मुक्ताफळं उधळलीये. शेतकर्‍यांच्या आत्महत्या या व्यसनाधिनता आणि प्रेमप्रकरणामुळे होत आहेत असं बेताल वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केलंय.

अस्मानी संकटामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी जीवन यात्रा संपवत आहे पण कृषीमंत्री शेतकर्‍यांचं सांत्वन करण्याचं सोडून जखमेवर मिठ चोळण्याच काम करत आहे. आज संसदेत शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी हे अजब लेखी उत्तर दिलंय.

हुंडाबळी, पडीक जमीन, बेरोजगारी, कौटुंबिक वाद, व्यसनाधिनता आणि प्रेम प्रकरणंही आत्महत्येची कारणं आहेत असं केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटलंय. कर्जबाजारीपणा, नापिकी, पाऊस न होणे ही कारणंही आहेत, असंही यापुढे सिंह म्हणालेत. या प्रमुख कारणांव्यतिरिक्त हुंडाबळी वगैरेही कारणं आहेत, असं एक अजब उत्तर राधामोहन सिंह यांनी दिलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close