S M L

संसदेबाहेर विरोधकांच्या विरोधात भाजप नेत्यांची निदर्शनं

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 05:26 PM IST

संसदेबाहेर विरोधकांच्या विरोधात भाजप नेत्यांची निदर्शनं

delhi protest24 जुलै : संसदेत पावसाळी अधिवेशनाचाही आजचा दिवस गाजतोय तो आंदोलनांनी...व्यापम आणि ललितगेटवरून विरोधक आक्रमक आहेत. तर या आंदोलनाला भाजपनंही आक्रमक उत्तर दिलंय. काँग्रेसशासित राज्यांमधल्या भ्रष्टाचारावरही चर्चा करा, अशी मागणी विरोधकांनी केलीय. ही मागणी करत संसदेबाहेर सत्ताधारी भाजपनेच घोषणाबाजी केलीय.

तर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, पंतप्रधानांना आम्ही शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी अनंतपूरमध्ये दिली आहे. तर भाजपनं केलेल्या आंदोलनावर शरद यादव यांनी टीका केली, सत्ताधार्‍यांनी आतापर्यंत कधी आंदोलन केलं नव्हतं, सत्ताधार्‍यांना आंदोलन करायची काय गरज असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तर आम्हाला कामकाज करायचं आहे, चर्चेला सरकार तयार आहे, सुषमा स्वराजही उत्तर द्यायला तयार आहे, पण काँग्रेस चर्चेला तयार होत नाही असं रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलंय. दरम्यान, व्यापम घोटाळ्याच्या मुद्द्यावर चर्चेचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी नाकारला. लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close