S M L

याकूब मेमनच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 27, 2015 03:39 PM IST

याकूब मेमनच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

27 जुलै : मुंबईतील 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या दया याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात उद्या (मंगळवारी) सकाळी सुनावणी होईल.

याकूबनं आपल्या याचिकेत डेथ वॉरंटला आक्षेप घेत, फाशी रद्द करण्याची मागणी करणारी दया याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. तर याकूबला 30 जुलैला फाशी देण्यात येईल असं सरकारने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात होणार्‍या सुनावणीत याकूबचं भवितव्य ठरणार आहे. तसंच याकूबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर केला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय येईपर्यंत फाशीला स्थगिती देण्यासाठी ही याचिका याकूबकडून दाखल करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2015 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close