S M L

या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देऊ -राजनाथ सिंग

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2015 04:29 PM IST

rajnath singh 327 जुलै : पंजाबमधील गुरदासपूर दहशतवादी हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संताप व्यक्त केलाय. आम्ही पहिल्यांदा हल्ला करणार नाही पण आम्ही याला सडेतोड उत्तर देऊ असा इशाराच राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिलाय.

तसंच आम्हाला पाकिस्तानशी शांततेचे संबंध हवे आहेत पण राष्ट्राच्या सन्मानाशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असंही सिंग यांनी पाकला ठणकावून सांगितलं.

राजनाथ सिंह यांनी पंजाबमधील घटनेमुळे अस्वस्थ झालोय अशी भावना व्यक्त केली. आम्हाला आमच्या शेजारी राष्ट्राशी चांगले संबंध हवे असताना सीमेवर दहशतवादी हल्ल्याच्या घटना का घडतायत, कळत नाही. पण चकमक संपल्यानंतरच यावर सविस्तर बोलत येईल असंही ते म्हणाले.

दरम्यान, या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचा आरोप भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2015 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close