S M L

हेमंत करकरे यांच्या पंचनाम्यात जॅकेटचा उल्लेखच नाही

8 डिसेंबर हेमंत करकरेंच्या बुलेटप्रूफ जॅकेटप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्या पंचनाम्यातून करकरे यांनी वापरलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा उल्लेखच गायब करण्यात आला आहे. तसंच पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही त्यांच्या जॅकेटचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 26-11 च्या हल्ल्यात शहिद झालेले ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी त्यांच्या अंगावर बुलेटप्रूफ जॅकेट नव्हते, अशी नोंद पोलिसांनी पंचनाम्यात केली आहे. शहिद हेमंत करकरे यांच्या गहाळ झालेल्या बुलेटप्रूफ जॅकेटप्रकरणी मंगळवारी मुंबईच्या जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात कलम 379 आणि कलम 120 (बी) या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जॅकेट गहाळ प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचेही आदेश माझगाव कोर्टानं दिले होते. हे जॅकेट शोधून काढण्याचे आदेशही कोर्टानं सरकारला दिलेत. काही दिवसांपूर्वी कविता करकरेंनी माहितीच्या अधिकाराखाली या गहाळ जॅकेटबद्दलची माहिती मिळवली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2009 01:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2009 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close