S M L

गुरदासपूर हल्ल्याचं अफगान-पाक कनेक्शन उघड, अतिरेकी पाकमधून आले

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2015 01:18 PM IST

terror_punjab229 जुलै : पंजाबमधील गुरदासपूर हल्ल्याचं कनेक्शन अफगानिस्तान आणि पाकिस्तानशी असल्याचं आढळून आलंय. हल्ल्याच्या ठिकाणी सापडलेले नाईट व्हिजन डिव्हाईसची अफगानिस्तातून तस्करी करण्यात आल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या सैन्यांकडून हरवलेले अशा प्रकारचे अनेक डिव्हाईस अफगानिस्तानात आहेत. या डिव्हाईसवरून अतिरेकी पाकमधून आल्याचं निष्कर्ष काढण्यात आलाय.

दोन दिवसांपूर्वी दिनानगर पोलीस ठाण्यावर हल्ला केलेले तीन दहशतवादी सीसीटीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. त्यामध्ये 'लष्कर-ए-तोयबा'चे हे दहशतवादी सोमवारी पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी रस्त्याच्या कडेला एका धाब्यामध्ये जाताना दिसतात. त्यांच्याकडे भरपूर शस्त्रं असल्याचंही दिसतंय. हा सीसीटीव्ही रस्त्यावरच्या एका दुकानात लावण्यात आला होता. याच रस्त्यावरून या दहशतवाद्यांनी ये-जा केल्यामुळे त्यांचं चित्रण झालंय. अतिरेक्यांनी सोमवारी पहाटे दिनानगर पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला होता. यात 3 पोलीस अधिकार्‍यांसह 9 जणांचा मृत्यू झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close