S M L

संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना मॅगसेसे पुरस्कार

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2015 01:38 PM IST

संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना मॅगसेसे पुरस्कार

29 जुलै : आशिया खंडातला प्रतिष्ठेचा मानाला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार दोन भारतीयांना जाहीर झालाय. सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि समाजसेवक आणि गूँज या संस्थेचा संस्थापक अंशू गुप्ता यांना २०१५ चा रॅमन मॅगसेसे हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय.

भ्रष्टाचाराविरोधात अविरत लढा देणे, खरेपणा आणि सचोटीनं काम करणे यासाठी चतुर्वेदी यांचा गौरव करण्यात आलाय. तर अंशू गुप्ता यांचंही कार्य खूप मोठं आहे. गेली अनेक वर्षं ते गूँज संस्था चालवतायत. जुन्या गोष्टींचं पुर्नवापर करुन ते गरिबांसाठी वस्तू बनवतात, आणि त्याचं वाटपही करतात. देशातल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमध्येही अंशू गुप्ता यांनी खूप मदतकार्य केलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close