S M L

याकूबची धावाधाव, पुन्हा राष्ट्रपतींकडे दया याचिका

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2015 04:28 PM IST

yakub 1993 Accussed29 जुलै : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमनची फाशी लांबवण्यासाठी धावाधाव सुरू आहे. याकूब मेमननं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पुन्हा नव्यानं दया याचिका केलीये. दुसरीकडे याकूबच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. याकूबच्या वकिलांचा युक्तिवाद संपलाय. आता ऍटर्नी जनरलचा युक्तिवाद सुरू आहे. आता थोड्याच वेळात निकाल देण्याचे न्यायाधीशांनी संकेत दिले आहे.

याकूब मेमनला उद्या फाशी देण्यासाठीचं डेथ वॉरंट काढण्यात आलंय. याकूबला उद्या फाशी होणार का याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. याकूबच्या शिक्षेला काल सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली होती. ज्या न्यायाधीशांपुढे ही सुनावणी झाली. त्यांच्यात फाशीवरून मतभेद होते आणि त्यामुळे खटला सरन्यायाधीशांच्या बेंचकडे पाठवण्यात आला होता. आज सकाळपासून यावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, याकूबची राष्ट्रपतींकडे नव्यानं याचिका म्हणजे फाशी लांबवण्याचा निरर्थक प्रयत्न असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close