S M L

आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत?

Samruddha Bhambure | Updated On: Jul 29, 2015 05:15 PM IST

आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत?

washingtontimescom29 जुलै : आयसिस भारतावर अतिरेकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पाकिस्तानी तालिबानशी संबंध असलेल्या एका व्यक्तीकडून अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी एक 32 पानी उर्दू दस्तावेज सापडलं आहे. या फाईलमधील माहितीचे भाषांतर करण्यात आल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यात भारताला लक्ष्य करतानाच पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानमधील तालिबान यांना एकत्र आणून दहशतवादाची एकच संघटना निर्माण करण्याचा आयसिसचा प्रयत्न असल्याचं यात म्हटलंय. दरम्यान, हा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेतील 3 अधिकार्‍यांनी तपासला असून, हा अहवाल आसिसचा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close