S M L

उंदीरमामा विमानात अवतरले, विमान माघारी परतले

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2015 01:22 PM IST

उंदीरमामा विमानात अवतरले, विमान माघारी परतले

 31 जुलै : घर असा की ऑफिस नको ते कुरतडून धुडगूस घालणारे उंदीरमामा अचानक एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात अवतरल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. अखेर या उंदीरमामाच्या धास्तीमुळे या विमानला माघारी परतणं भाग पाडलं. एअर इंडियाच्या दिल्लीहून मिलानला जाणार्‍या विमानात ही घटना घडली.

त्याचं झालं असं की, गुरुवारी दिल्लीहून एअर इंडियाच्या एआय-123 या विमानानं मिलानच्या दिशेनं उड्डाण केलं. त्यात जवळपास 200 प्रवासी होते. उड्डाणाच्या दोन तासांनंतर  विमानात उंदीर असल्याचं प्रवासी आणि केबिन क्रूच्या लक्षात आलं. विमानात उंदीर असल्यानं विमान शक्य तितक्या लवकर उतरवणं गरजेचं होतं. त्यामुळे विमान दिल्लीला परतवण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि दिल्ली विमानतळावर विमान उतरवल्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सफाई कर्मचार्‍यांनी उंदीरमामांना अखेर विमानातून उसकावून लावले. त्यानंतर पुन्हा विमानाने टेक ऑफ केलं. पण या सगळ्या नाट्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा खोळंबा झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close