S M L

भारत-बांगलादेश सीमा करार लागू,भारतात येणार 14 हजार नवे नागरिक

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2015 02:11 PM IST

भारत-बांगलादेश सीमा करार लागू,भारतात येणार 14 हजार नवे नागरिक

01 ऑगस्ट : भारत आणि बांगलादेशसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. दोन महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात सीमाकरार झाला होता. यात दोन्ही देश आपापल्या काही भूभागांची अदलाबदल करणार होते. हा करार शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात आला. यामुळे भारताला 14,214 नवे नागरिक मिळाले आहेत.

त्याचबरोबर भारताला 7 हजार एकर नवी जमीन मिळाली आहे, तर भारताच्या ताब्यात असलेली 17 हजार एकर जमीन बांगलादेशात गेलीय. खरं तर सर्वच भूभाग छोटी छोटी बेटं आहेत. आधी बांगलादेशच्या अखत्यारित असलेल्या भूभागांना भारताचा वेढा होता, आणि भारतात असणारी जमीन बांगलादेशनं वेढली होती. यामुळे तिथे राहणार्‍या जनतेला कोणत्याच सरकारच्या सोयीसुविधा मिळायच्या नाहीत. कित्येक पिढ्या हा मोठा त्रास सहन करत जगल्या. आता अखेर यावर तोडगा निघालाय. भारताच्या या 14 हजार नागरिकांना लवकरच रेशन कार्ड आणि आधार कार्ड देण्यात येतील. या भूभागांना नवे पिन कोड्सही दिले जाणार आहेत.

नेमका हा करार काय ?

भारताला काय मिळालं

- बांगलादेशचे 51 भूभाग

- 7110 एकर जमीन

- 14,214 नागरिक

बांगलादेशला काय मिळालं

- 111 भारतीय भूभाग

- 17,160 एकर जमीन

- एकही नवीन नागरिक नाही

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2015 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close