S M L

आदित्य ठाकरेंचा टॅब मोदींना भावला !

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2015 03:06 PM IST

आदित्य ठाकरेंचा टॅब मोदींना भावला !

01 ऑगस्ट : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या नवी दिल्लीच्या सेव्हन रेस कोर्स रोड या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी शालेय अभ्यासक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वापरण्यात येणार्‍या टॅबचं आदित्यनं मोदींसमोर सादरीकरण केलं. मोदींना हा टॅब आवडला असून त्यांनी तो स्वता:कडे ठेवून घेतला अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरच ओझ हलकं व्हावं यासाठी शिवसेनेनं पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अलीकडेच टॅब देऊ केले. याबाबतच आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. आदित्य आणि मोदी यांच्यात तासभर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' योजनेतून हा प्रयोग राबवावा अशी इच्छा आदित्यंनी व्यक्त केली. तसंच मोदींनी मुंबईत आल्यास पालिकेच्या शाळेतूल व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे विद्यार्थ्यांनी संवाद साधवा अशी कल्पना मांडली. मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. आणि राज्यभरात विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून शिक्षण द्यावा अशी संकल्पना मांडली होती. या भेटीदरम्यान सेनेचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर आणि राजन विचारेही उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2015 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close