S M L

मन की बात करणार्‍या पंतप्रधानांचं मौनव्रत - सोनिया गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2015 01:21 PM IST

मन की बात करणार्‍या पंतप्रधानांचं मौनव्रत - सोनिया गांधी

03 ऑगस्ट : मन की बात करणार्‍या पंतप्रधानांनी त्यांच्या सहकार्‍यांवर होणार्‍या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मात्र मौनव्रत धारण केलं आहे, अशी बोचरी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. सरकार जबाबदारीने वागण्याऐवजी संख्याबळाचा वापर करत अहंकार दाखवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक आज (सोमवारी) पार पडली. या बैठकीत सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आधी चर्चा मग कारवाई या मोदी सरकारच्या आम्ही निषेध करतो असं त्यांनी बैठकीत स्पष्ट केलं. तसंच केंद्राचं शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष असल्याचं सांगत भ्रष्टाचारी मंत्र्यांना पंतप्रधानांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या भाजपा मंत्र्यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम असून, भ्रष्टाचारी मंत्री राजीनामा देईपर्यंत काँग्रेसचा विरोध कायम राहणार असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

विरोधकांच्या गोधळांमुळे गेल्या 13 दिवसापासून संसदेचे कामकाज चालले नाही. आजही संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांचा गोधळ कायम होता. विरोधकांनी वेलमध्ये उतरून सुषमा स्वराज यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्या. दरम्यान प्रचंड गदारोळामुळे संसदेतील दोन्ही सभागृहाचे कामकाज 2 वाजेपर्यत तहकूब करण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2015 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close